
Celebrating the Life of
November 16, 1936 — May 3, 2024
Please share a photo or video, or post a heartfelt condolence to the family.

Dada Aaji’s wedding: family portrait

25th wedding anniversary

Sweta, I am sorry to hear the sad news of Digambar Ketkar (Digu as we called him) passing away. He was an outstanding Geotechnical engineer and worked for Cementation Company. I was working for Engineers India Limited. We were consultants to Madras Refinery (MRL) project. Ketkar did the soils investigation and predicted a large settlement of the oil storage tanks under the weight of the oil contained in them. MRL a joint project of Government of India, AMOCO and National Iranian Oil Company (NIOC). Senior engineers from the Government did not believe Ketkar’s predictions and in fact criticised his conclusions. They were soon to find out their mistake. Some abnormal settlement did take place and the floating roof which floored over the oil got stuck. Later I did a model study of the floating roof in our lab in VJTI. Any way, deeply grieved. Please convey to his son and the family.

Dada’s 80th, December 2016



USA, 2010 and 2014

The favourite Gin & Tonic, cheers

Like Grandfather, like Grandson

Last photo together at Aseem’s munja, London, May 2012

Dada’s last photo: after coming back from his evening “walk” (now in a wheelchair), Pune Home, March 2024

Dear Dada, I know you are in a happier place in heaven, drinking chahaa and playing “patte” with Manda Aaji who you so dearly missed for the last 12 years. As your eldest granddaughter, you gave me so much love, I couldn’t have asked for a better childhood thanks to you and Aaji. A very respected man of few words that you were for the rest of the world, you still answered the unending silly questions of the six year old me, always gave me your last piece of “aamba”, played dongar ka paani with my friends and listened to my same stories for hours daily after we moved to Pune. After Aaji passed away, I saw a different version of you wherein I had to play the “Piku” to your “Bhashkorda” while our Shankar Kaka was there as always being your “Budhan”. Dada, I want to say your life has been an inspiration for so many and so is the beautiful family that you have raised. I am so proud of my Baba and Abhay Kaka for being such ideal sons and Aai and Sonal Kaku for wholeheartedly becoming the daughters you brought into the family. I am always intrigued at how easy going you were; how you were particular but still never imposing. You made the light blue shirt with navy sweater and the dentobac paste with baby brush a style statement! Your neatness, intelligence and humility always amazed me. You never boasted, but we now realise (after you are gone) how popular, respected and loved you were! Dada, your dementia took you away from us a while ago, but you were still there and now we miss your presence! I am sure Baba misses checking the camera every hour, Aai misses making your doodh poli before dinner. Now, there’s nobody in the room downstairs for Apar to peek into to ask “Dada jevle ka”. I will always regret not being around you in your last days but I’ll always be grateful for the beautiful 28 years you were with us. Ofcourse I would have loved it had you stayed “a little longer”.. Lots of love from your Proud granddaughter, Apurva Avadhut “Digambar” Ketkar

डॉ. मनिषा केतकर आमचे दादा म्हणजे माझे सासरे. परवा त्यांना देवज्ञा झाली. आमच्या केतकरांकडील ते सर्वात मोठे. त्यामुळे एक मोठा आधार गेल्यासारखे वाटले. म्हणतात ना ‘ नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा‘ यासाठी तरी जेष्ठ मंडळी घरात हवीतच. खरंच एक आधार, एक सोबत असते. आमच्या पणजीआजी म्हणजे माझ्या आज्जेसासूबाई, त्यांची मला नेहमीच आठवण येते. त्यांनी माझ्यावर खरंच खूप प्रेम केलं. दुधापेक्षा साईवर जास्त माया असते तस सूनेपेक्षा नातसूनेवर जास्त माया असते का? पणजी आज्जीनंतर कोणाशी मोकळेपणाने बोलता यायचे तर ते दादा ! मी कधी बसून त्यांच्याशी गप्पा मारल्याच आठवत नाही पण काहीही खटकल किंवा आवडलं नाही तर ते त्यांना सांगण्याएवढा मोकळेपणा जरूर होता. सासूबाईं गेल्यावर दादांनी त्यांच्या सुवाच्य अक्षरात दादांच्या पसंतीच्या खाद्यपदार्थांची सूची मला लिहून दिली होती. सर्वच गोड पदार्थ, विशेषतः आम्रखंड, श्रीखंड आणि चहा हे त्यांच्या खास आवडीचे तर सतत चालणे आणि तेही चढत्या उन्हात ही त्यांची खासियत. माझ्या माहेरी एकत्र कुटुंब होतं. फक्त घरातल्या मुलामुलींची लग्नं असतील तरच भल्या मोठ्या दाराला भल मोठ कुलूप लागायचं. सासरीसुद्धा आधी पणजीआजी आणि नंतर दादा कायम घरात असल्यामुळे, आमचं घर नेहमी उघडच असायचं. कधी कुलूप लावायची किंवा उघडायची माझ्या एकटीवर वेळच आली नाही. आता सकाळी दूध तापवताना दादांचे कॉर्नफ्लेक्स भिजवायचे आहेत किंवा रात्रीचं दूध तापवताना दादांची पोळी भिजवायची आहे आणि अशा वेळोवेळी आठवणी येतात. कदाचित आपलं वय जसं वाढतं तसं आपण जास्त हळवे होतो का?

दादा म्हटलं की एक मोठं व्यक्तित्व.. पण माझ्यासाठी ते लहानपापासून बाबांचे "मामा" आजी चे "आमचा दादा" आणि अपूर्वा चे अजोबा जे माझे पण आजोबा आहेत somehow 😅 जे आमच्याशी रात्री डोंगर का पाणी खेळायचे न दमता! जशी मोठी होत गेले तसे कळू लागले दादांनी काय काय achieve केलं आहे आणि सगळे त्यांचा एवढा आदर का करायचे..पण त्यांच्या म्हणणयाप्रमाणे "मी साधा माणूस आहे" आणि हे शब्दशः खरं होतं.. blue shirt आणि brown pant हा त्यांचा साधा पोशाख असे, आणि वागणूक ही साधी आणि प्रेमळ..आणि उगाच सल्ला देणार नाहीत पण कोणी काही विचारलं तर त्यांना असलेली सगळी माहिती सांगणार..आणि जमेल ती मदत करणार २०१२ नंतर त्यांचा आमच्या घरी येणं वाढला.. ते गिरगांवात राहायला असेल की जेवायला यायचे.. दुपारी जेवायला आम्ही दोघच असायचो, एक college la जाणारी मुलगी आणि तिचे ८० वर्षाचे आजोबा काय बोलणार असा प्रश्न मला पहिल्या दिवशी पडला.. मी आई ला म्हटलं देखील की मी दादांशी काय बोलणार.. एवढ्या मोठ्या व्यक्तीशी (वयानी व मानानेही) पण दादांनी एवढ्या सहजतेने माझ्याशी गप्पा मारल्या की मी रोज जेवणाच्या वेळेची वाट बघायचे.. त्यांच्या आुष्यातील अनेक किस्से ते मला सांगायचे.. कुठे कसा अभ्यास केला, कुठे dam bandhle.. kase rahile.. अश्या किततरी गोष्टी.. त्यांचा आणि माझा आवडीचा विषय आणि छंद म्हंजे "चहा" मी एकदा कॉलेज च्या study tour साठी राजस्थान ला जाणार होते तेव्हा मला दादांनी बजावून सांगितले होते की तिथे पाणी प्यायचे नाही..तिथले पाणी खूप दूषित असते, तहान लागली की चहा पी, तो उकळलेला असतो म्हणून त्याचा त्रास होत नाही.. मी पुण्यात विनय काका मनीषा काकू कडे तीन महिने राहायला होते.. तेव्हा रोज सकाळी bakery मधे जायच्या आधी दादा आणि मी चहा प्यायचो..तेव्हा रोज आमचं एक च conversation असायचं, तू किती दिवस आहेस इथे.. मग आता कामाला जायचंय ते किती लांब आहे.. तू एकटी जाणार का? तू काय, इतके तास cake बनवतेस, कमाल आहे तुझी..तू मुंबई ल जाशील तेव्हा माझं पण तिकिट काढ आणि मला पण ने.. आता कामाला स्कूटर नी जाणार आहेस..तर नीट जा, fast चालवायची नाही... ते हे विसरायचे की काल ही आम्ही हेच बोललो होतो.. पण ते कधी आपुलकीने बोलणं विसरले नाहीत, कौतुक करणं विसरले नाहीत, काळजी करणे विसरले नाहीत..आणि गिरगाव (त्यांचा जीव की प्राण) त्यांच्या बद्दल सगळ्यांनी इतका काही लिहिले आहे..आणि अजून किती तरी बोलण्या सारखे आहे की बोलू तितके कमीच.. काही शब्दात त्यांचे वर्णन करायचे झाले तर - साधे, नम्र, कौतुक करायला पाहिले! असे आमचे दादा...

दादा एक आठवण ती दादांचे व्यक्तिमत्त्व हे अनेक पैलूंनी सजलेले होते. शांत, सयंमी, प्रसन्न आणि कायम ऊर्जेने भरलेले होते. सर्वांच्या दृष्टीने आदर्श मुलगा, आदर्श नवरा आणि आदर्श वडील पण माझ्या दृष्टीने, सर्वांनाच हवाहवासा वाटेल असा आदर्श मामा होता. ती आई-बाबांना कोणत्याही अडचणीच्या वेळी मामाचाच खंभीर आधार आणि भक्कम पाठींबा होता. मामा नेहमी म्हणत असे कि, मुलांना ओरडायचे नाही तर त्यांना समजावून सांगायचे. हे मी स्वतः अनुभवले आहे, मी कॉलेजमधे असताना माझी कॉलेजच्या बॉक्सिंग टीम मध्ये निवड झाली होती. बॉक्सिंगमध्ये भाग घेण्याला बाबांची संमती होती पण आईचा विरोध होता. एके दिवशी प्रॅक्टीस करून मी घरी आलो तेव्हा माझा ओठ सुजला होता ते बघितल्यावर आईने मामाला ही गोष्ट सांगितली व मला दम देण्यास सांगितलं. मामाने मला भेटायला बोलावले आणि मी भेटताच मला फक्त विचारले की तुला दुसरा खेळ मिळाला नाही का? या एका वाक्यात मी समजलो मामाला काय म्हणायचे आहे ते. कुठल्याही प्रकारचा राग नाही की मोठा आवाज नाही पण योग्य परिणाम असा की मी दुसऱ्याच दिवसापासून प्रॅक्टीसला जाणे बंद केले. मामानं कधीही देवधर्माला किंवा कर्मकांडाला अवास्तव महत्व दिले नाही परंतु दर गुरुवारी न चुकता घरातील श्री दत्तगुरुंना हार व प्रसाद आणि दररोज रामाचे दर्शन घेण्याचे घेण्याचे कधीही सोडले नाही. साधी राहणी आणि अतिशय उच्च विचारसरणी ही मामाची खासियत होती. स्वकष्टाने मिळवलेल्या श्रीमंतीचा कधीच बडेजाव केला नाही उलट गरजूनां कायम मदतच केली त्यामुळेच तो सर्वाना आपलाच वाटे. ती आजी, आई-बाबांच्या नंतर मामाचाच मला मानसिक आधार होता. मामाकडे सर्व समस्यांचे निराकारण होत असे मग त्या मानसिक असोत वा आर्थिक. त्याने दिलेला सल्ला हा नेहमी आपुलकीने व सर्वांगीण विचार करूनच दिलेला असायचा त्यामुळे सर्वच समस्यांवर तोडगा निघे. मामाबद्दल लिहीन तेवढे थोडेच आहे. सर्वगुण संपन्न मामाचा एखादा सद्गुण थोडाफार जरी अंगीकारता आला तर तीच खरी श्रद्धांजली होईल.

Dearest Dada, It breaks my heart to see your warm smile only in a photo frame now. I will miss you every day. I am short of words to express what you mean to me and how comforting your presence always was. Thank you for everything. PS : I know you are beaming from ear to ear with Manda Aaji now and also after seeing me struggle write 12 lines over a good 120 mins. Love, Aparna

ती. दादाकाका निवर्तल्याची (बाळदादा/ दि. ज. केतकर) अत्यंत वाईट बातमी कळली. भौगोलिक अंतर जाणवतंय, झोप लागत नाहिये रात्रभर….. त्यातच हे लिहुन काढतोय. ते पुर्ण आयुष्य जगले. आता वयपरत्वे आलेला आजार हे कारण, पण आपल्याला आपलं माणुस हवंच असतं ना. ईश्वरी इच्छेपुढे आपला नाईलाज आहे. त्यांना सद्गती मिळो ही दत्तगुरुंकडे मनोमन प्रार्थना. *आपलं कुटुंब खरंच भाग्यवान की असं उत्तुंग आदर्श खरंतर ऋषितुल्य व्यक्तिमत्व मार्गदर्शक म्हणुन आपल्याला घरीच लाभलं*…… ती. दादाकाकांनी जे अमाप प्रेम आयुष्यभर सर्वांना दिलं ती गोष्ट खरंच खुप निराळी आहे. त्यांच्या प्रत्येक व्यवहारामध्ये, कामामध्ये, संवादामध्ये माया पुरेपुर असे. सहजपणा असे कारण आपल्या संस्कृतीवरचं, घरावरचं त्यांचं प्रेम अतुलनीय होतं. त्यांचं जवळजवळ ८६ वर्षांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी वस्तुपाठ आहे. त्यांचे पंचेचाळीस-पन्नाशीनंतरचे दिवस आम्हां मुलांना माहित. त्याआधीचा काळही वडिलधाऱ्यांकडुन जेव्हढा समजला त्याप्रमाणे सदैव सर्व प्रकारचा आधार देणारं व्यक्तिमत्व असाच होता. आत्तापर्यंत लहान/मोठा कोणताही कठीण निर्णय घेताना सल्ला मागितला की कुठुन आमच्यासाठी ते इतका वेळ निर्माण करत असंत ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. सर्व सांगितल्यावर नक्की पटल्याची खातरजमा करत असंत, इतके मोठे असुन समजुनही व्यवस्थित घेत, उमगलेला वेगळा पैलु हाताळत. नवी जुनी उदाहरणे देत. चर्चेला अखंड रात्र मग आमचीच असे. आणि हो चहा असला की झालं! म ते साखरपा, रत्नागिरी, गिरगांव, पुणे असुदे की अगदी केनिया, मस्कतपण. आशीर्वाद, वरदहस्त या संकल्पना त्यांच्याबद्दल नितांत प्रामाणिक होत्या. खुप घेण्यासारखं आहे त्यात असे नेहमी वाटे. त्यांचं दान सुरुच होतं अखंड. आपण खुप भाग्यवान. आपला पृथ्वीवरचा तेजोमय सुर्य आज अस्ताला गेला पण नंतर राहिलेल्या आठवणींच्या चंद्राचा शीतल प्रकाशही खरंतर त्याचाच आहे ही खुणगाठ देत देत गेला. हल्ली ते प्रकृतीमुळे फारसे फिरत नसंत पण आत्ता जानेवारीतही विनयदादाकडे एक ताजी स्मरणमण्यांची नवी सर ओवली गेली. अगदी अभयदादा, अजितदादा बरोबरच्या भेटीत, गोष्टींमध्ये काका कदाचित तिथे प्रत्यक्षात असले नसले तरी त्यांची उपस्थिति लंडन, न्यूयॉर्क मध्येही जाणवे. याबद्दल मोठे काका काय म्हणतील असे वाटत राही व पुढेही वाटेल. कदाचित हीच भावना आपली कर्मयोग, सन्मार्गावरती राहण्याची चिरंतन उर्जा असेल. सर्व बृहद कुटुंबालाही त्याचे पुण्यफळ मिळतंच राहील. 🙏🏻 आम्ही दोघं साखरप्यात राहुन शिकलो, पुढे गेलो याचा त्यांना निखळ आनंद होता. आईबाबांच्या महत्वाच्या निर्णयांना त्या दोघांनी दिलेल्या साथीशिवाय आमची प्रगती शक्यच नव्हती! त्यांनी सर्वानाच खरंतर निर्णय कसा घ्यावा हे शिकवलं, प्रॅक्टीकलची जोड दिली. त्यांच्यातला सर्जनशील अभियंता नेहमी जागृत असे. ते कुटुंबात शिखरावर होते पण एकटे केव्हाच नव्हते. हे त्यांचं निराळेपण. भाक्रा नांगल पासुन भंडारदऱ्यापर्यंत आणि राधानगरीपासुन पेरियार पर्यंतची कार्यसिध्दी, VJTI, आय आय टी तलं तेव्हाचं शिक्षण, ब्रिटीश कंपनी Cemendia/Trafalgar ची जरी नामांतरं कितीही झाली तरी त्यांनी दिलेली तब्बल ३८ वर्षांची साथ, अगदी हल्लीची कोंकण रेलवे ट्रॅकच्या बाजुचं भुस्खलन रोखण्यासाठीची कामे/सल्ले, आयुर्वेद/होमिओपथी वरचा विश्वास, भारतभ्रमण, अल्जेरियातले निराळे वातावरण, इंग्लंड/युरोप अमेरिकेबद्दलचे मार्मिक अनुभव हे सर्व कुठलंही अवडंबर न करता उलगडण्याचं कसब त्यांच्यात होतं. गावी घरी कुणीही आपलं यायचं, आणि खासकरुन दादाकाका मंदाकाकु यायचे, म्हणजे आधीपासुनच भारलेलं वातावरण असे. त्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा होता, शब्दांपलिकडची सलगी, आपुलकी त्यामध्ये होती. मंदाकाकु असाच आघात करुन आधीच १२ वर्षांपुर्वी आजारामुळे अकस्मात गेली. आता काकापण रुढार्थाने नाहीत, पण तरीही आहेत, सदैव इथे असतील. आनंदाची ती शिदोरी कायम टिकेल. त्यांनी आयुष्यभर जे भरभरुन दिलं त्या साठवणीवर आणि त्यांच्याबरोबरच्या शिकवणाऱ्या, सहजसुंदर, मिश्कील गोड आठवणींच्या जोरावर मार्गक्रमण करत राहु. आपण कुटुंबातील सर्व जवळच्यांनी एकमेकांना आधार द्यायला हवा. तुम्ही सर्वांनीही जपा स्वतःला. भेटुया, बोलत राहुया. श्री गुरुदेव दत्त. 🙏🏻🙏🏻 आपला, समीर.


Abhay, Please accept my sincere condolences on the passing away of your beloved dad. It is literally an end of an era in a way. He was always such a warm and interesting person with a ready smile and a witty remark. Even as a 14-15 year old when I first met him he always chatted to me as if he was a friend himself - rather than a friend’s dad! He will forever be very fondly remembered by me. 🙏🙏

Abhay, Sorry to hear the loss of your Dad. He was a real gentleman and I’ll miss chatting with him over a “sundowner”.. Bob

चार एक दिवसांपूर्वी बाळदादा केतकर इहलोक सोडून गेल्याची दुःखद बातमी आली, मन स्तब्ध झाले, आम्ही एकाच चाळीतील रहिवासी असलो तरी वयाच्या अंतरामुळे आमचे एकमेकांशी संवाद साधण्याचे/ बोलण्याचे थेट संबंध माझ्या लहानपणी व अगदी तारुण्यात कधी आलेच नाहीत तरी देखील माझ्या तसेच माझ्या समवयस्क मुलांमध्ये त्यांचा एक सन्माननीय व्यक्ती म्हणून प्रभाव होता त्याची अनेक कारणे आहेत सा.ग.उ.म.चे ते कायमस्वरूपी खजिनदार होते,उत्सवाच्या सुरवातीला अपेक्षित असलेली वर्गणी त्यांच्याकडून येत नसे तर उत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर दरवर्षी जमेपेक्षा खर्च अधीक घडत असल्यामुळे तूट भरून जमाखर्चाचा समनव्यय साधणे एवढी त्यांची वर्गणी असे, त्याचा गाजावाजा, मोठेपणा त्यांनी कधी मिरवला नाही! आपल्या चाळीतील काही आगाऊ मुलांनी (५० एक वर्षांपूर्वी) फणसवाडीतील मुलांशी पतंगाच्या साध्या कारणावरून मोठठ भांडण उकरलं होतं त्याची परिणीती तिकडल्या ३०-४० जणांनी चाळीत रात्रीच्या ८ च्या सुमारास जवळजवळ घुसखोरी केल्यास्वरूपात झाली होती त्यावेळी बाळदादांनी चाळीतील काही वरिष्ठांच्या साथीने त्यांना केवळ स्वतःच्या बोलण्याने अगदी सलोख्याने परतवून लावले होते त्याकरिता बाळदादांची बुद्धिमता,शांत स्वभाव, बोलण्यातील मृदुलता व विनम्रता आणि त्यामुळे चेहऱ्यावर प्राप्त झालेली असामान्य तेजस्विता व त्यासाथीने येणारी निर्भयताच कामी आली होती,जशी बुद्ध वनातुन संचार करताना हल्लेखोरांची शस्त्रे आपसूकच गळून पडंत, दृष्टी त्यांच्यापुढे नतमस्तक होई अगदी तशीच भासली होती मला! मला लहानपणापासून दररोज देवळात जायची सवय होती तेंव्हा कित्येकदा बाळदादांना उभे राहून प्रवचन ऐकतांना मी पाहिले आहे! कदाचित त्यामुळेच त्यांना अहंकार कधी शिवलाच नाही, स्वतःकडे कंपनीने दिलेल्या चालकासह गाडी असताना देखील शेजारीच राहणाऱ्या दुसऱ्या वाहनचालकाशी त्यांचे वागणे साधेपणा व सतत जमिनीवर पाय असण्याचे सर्वोत्तम उदाहरण होते, सुरवातीला त्यांच्याकडे जीप होती त्या जीप मधून ते मांजरवाडीतील लहानमुलांना नाक्यापर्यंत फिरवत असंत, त्यामुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतांना मी पाहिलंय आणि आठवतंय मला! मी एअरफोर्स मध्ये असतांना काही काळाकरीता फिल्ड एरियात होतो तेंव्हा माधवी व मुलगा आदित्य चाळीतच राहात होते, तेंव्हा शंकर आदित्यला केतकरांकडे घेऊन जात असे, त्यांच्या परिवारात सर्वांनाच त्याचा लळा लागला होता,जसा काही त्यांच्याच परिवाराचा सदस्य! माझी पोस्टिंग पीस एरियात होता क्षणिक मी त्यांना न्यायला आलो, संध्याकाळच्या वेळी आदित्य बाळदादांच्या कडेवर होता,माझ्याकडे तो आला नाही, दुसऱ्या दिवशी आम्ही जालंधरला जाण्यासाठी निघालो संध्याकाळ झाली तेंव्हा आदित्यने ट्रेन मध्ये भाईकडे (विनय) जायचंय म्हणून धुमाकूळ घातलांन, रड रड रडून थकला तेव्हाच थांबला! आता पुलाखालून खूप पाणी गेलंय तो ही वयाने मोठा झाला, परदेशातून तो येईल आणि भाईला भेटायला तो घरी जाईल तेव्हा बाळदादा मात्र त्याला भेटणार नाहीत,दिसणार नाहीत! परंतु बाळदादांनी दिलेले प्रेम त्याच्या हृदयात व त्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायमस्वरूपी राहतील ह्यात तीळमात्र शंका नाही! शिक्षकांच्या वर्गात बाकावर बसूनच शिकले जाते असे नाही तर बाळदादांच्या व्यक्तिमत्वाची नुसती आठवण काढली तरी आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे! शतशः नमन 🙏 संजय सहस्रबुद्धे.

दादांचं आमच्या घराशी ही खूप महत्त्वाचं नातं होतं. अण्णा लहान असताना त्यांना electrical engineering करण्याचा सल्ला दादांनी दिला होता. तेव्हा ते फील्ड अप कमिंग होतं आणि त्या सल्ल्याप्रमाणे अण्णांनी शिक्षण घेतलं. या गोष्टी करता अण्णा दादांना फार मानत. ताई, अजित,.स्वाती हे एकच वयाचे असल्याने लहान असताना ती खूप वेळा तुमच्या घरी खेळायला येत असेल. तेव्हाच्या अनेक आठवणी तिच्याही मनात आहेत. माझं आणि पणजी आजीचं जरा विशेष होतं. 😀 त्यांनी मला standing instruction दिली होती की दर गुरुवारी दत्ताचा प्रसादाचा पेढा घ्यायला येत जा. आणि मी अगदी न चुकता जात असे. मुकादम असल्यासारखी. एकदा त्या आत होत्या स्वैपाक घरात. दादा होते बाहेर. मी तिथे तशीच उभी. पेढा घ्यायला 🙈. दादांनी मग आजींना सांगितलं बघ ग जरा. तेव्हा मग त्या म्हणाल्या मीच बोलावलं होतं म्हणून. 😀 किती आठवणी! अनंत आठवणी जोडलेल्या असतात एकेका माणसासोबत. वयपरत्वे माणसं जाणार असं जरी असलं तरी जीवाला चुटपुट लागतेच. पण इतक्या सगळ्या आठवणींची साठवण आपल्याला त्या त्या माणसांशी जोडून ठेवते. हीच आपली कमाई. 🙏

Princeton, October 2007. Your parents meant a lot to my parents and me. At pivotal times, after 10th grade and when I quit IIT, my parents dispatched me to consult with Balmama. His wise counsel helped convince my parents that I was on the right path.

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. माझा एक मामा उच्चपदस्थ सिव्हील इंजिनीअर आहे, भारतभर तर फिरला आहेच पण इराण-इराकच्या हद्दीवरही कामानिमित्त जाऊन आला आहे. एकदा तो गिरगावात आमच्याकडे आला होता. गप्पांच्या ओघात डॅडी त्याला सहज म्हणाले, “माझा एक मित्रदेखील सिव्हिल इंजिनिअर आहे आणि बऱ्यापैकी फिरत असतो. खालीच राहतो, केतकर नाव त्याचं.” मामा उडालाच! “ते केतकर इथे राहतात? या चाळीत?” “अहो, अत्यंत बुद्धिमान मनुष्य आहे तो आणि खूप accomplished! तो इथे राहतो?! एवढा साधा आहे तो?” मामा बाहेर पडल्यावर डॅडी म्हणाले, तरी बरं मी त्याला सांगितलं नाही की बाळ परदेशप्रवास करून घरी येतो आणि लगेच निळा टीशर्ट व चट्टेपट्टेरी शॉर्ट घालून बाहेर गप्पा मारायला येतो! इतर कोणी म्हंटलं असतं तर ती कुचेष्टा वाटली असती पण डॅडी व बाळदादा यांची मैत्री जुनी आणि दृढ होती. डॅडीमम्मीच्या लग्नाच्या २ दिवस आधी मंदाताईंचं डोहाळजेवण होतं, त्याच रात्री दादा बाहेरगावी जाणार होते. मम्मी थेट ऑफिसमधून आली आणि डॅडी तिला केतकरांकडे भेटायला घेऊन गेले. चि. सौ. का. मंदाला पहिलं कापड द्यायचा मान आजींचा - दादांच्या निमित्ताने. ती मैत्री नंतर फक्त दोघांपुरतीच मर्यादित राहिली नाही, दोन्ही मंदा जिवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. बाहेर एवढा दबदबा असलेले दादा आम्हाला कायम साधेच वाटले त्याला कारण केवळ हा पोशाख नाही तर सर्वांशी मिश्किल आणि मृदू वागणं हे होतं. दाराशी गाडी होती म्हणून बाकी अनेक वर्षे आम्हाला ना दादांची सांपत्तिक स्थिती ठाऊक होती ना अशी कर्तबगारी. परदेशी जातात ते फक्त तातांना नमस्कार करायला यायचे किंवा ‘जाऊन येतो रे ‘ असं डॅडीना सांगायला यायचे म्हणूनच कळायचं. (तो संस्कार माझ्यातही रुजला -त्यांच्यामुळे.) उगीच मुलांवर ओरडणं, त्यांना सल्ले देणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. मला आठवतं, माझी मुलगी अगदी १०-११ महिन्याची असताना ते तिला बघायला आले होते. त्यादिवशी मी अनेकांकडून खूप सल्ले ऐकून घेतले होते आणि जेरीला आले होते. आता दादा काय सांगतात याच विचारात होते. त्यांनी काय ‘सल्ला’ द्यावा? “बाकीचं सगळं जाऊ दे. मी एकच सांगतो, उगीचच चार लोकांच्या समोर तिला हे गाणं म्हण, तो श्लोक ऐकव वगैरे करायला लावायचं नाही. मुलं आपलं ऐकत नाहीत, आपलं हसं होतं आणि लोकांनाही कंटाळा येतो!”. (तो सल्ला मी बऱ्यापैकी मानला आहे, त्यामुळे मायलेकींच्या भांडणांची १०००० वरून ९००० आली आहे!) कुठल्याही चाकोरीत न बसणारे दादा एक ‘वल्ली’ होते. सिव्हिल इंजिनिअरिंग हा त्यांचा कामाचाच नाही तर जिव्हाळ्याचा विषय होता. आम्ही सगळे एकदा नायगारा धबधबा बघायला गेलो होतो. जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक आश्चर्य वगैरे जाऊ द्या - त्यांचा जीव अमेरिकेतील लांब, रुंद, पक्क्या रस्त्यांमध्ये गुंतला होता. मी व भाई एकाच कॉलेजात होतो. एरवी बऱ्यापैकी गोंधळ असलेल्या आमच्या कॉलेजला एकदा रामराज्य वसवायचा झटका आला आणि विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीकडे प्राचार्यांची वक्रदृष्टी गेली. भाईची हजेरी अपेक्षेपेक्षा खूप कमी होती, घरी पत्र गेलं. पालकभेटीसाठी दादांनी रजा घेतली आणि आदल्या रात्री अभयला विचारलं, तुझा कॉलेजमधला attendance कसा आहे? मी एवीतेवी रजा घेऊन भाईच्या कॉलेजात जाणार आहे, तुझ्यासाठी वेगळी रजा नको! (दोन्ही मुलं आपापल्या क्षेत्रात यशस्वी व कर्तबगार आहेत तेंव्हा हा किस्सा मी बिनदिक्कतपणे लिहू शकले!) एकदा दादा डोंबिवलीच्या काकांकडे गेले होते. संध्याकाळी परतले, रात्री काकूंचा मंदाताईंचा फोन आला. “अगं, बाळ येऊन गेला पण किती वेळ ते नातींचं कौतुक करत होता!” त्यावर मंदाताई त्यांना म्हणाली, पुन्हा जर का बाळ नातींबद्दल बोलायला लागला तर तुम्ही असं करा, त्याला एखादी गळकी भिंत, सैल नळ वगैरे दाखवा, मग बाळ त्यावर बोलत राहील. (हा किस्सा जितका दादांच्या वल्लीपणाचा आहे तितकाच मंदाताईच्या व्यक्तिमत्वाचाही!) आधुनिक श्रावण बाळ म्हणता येतील असे आईवडिलांची काळजी घेणारे दादा (आणि त्यांना तितक्याच प्रेमाने साथ करणारी मंदाताई!), एरवी खाणं, पिणं, झोपणं, उठणं यात वेळेची बंधनं न पाळणारे, चाळीतून बाहेर पडताना न चुकता वरील फोटोला नमस्कार करणारे, स्वतः काटकसरीने राहणारे पण देताना खुल्या हाताने देणारे, गणेशोत्सवात जमेल ते योगदान आणि घरी असले तर न चुकता आरतीला जाणारे, मानमरातब वगैरे बाजूला सारून चहा आणि गप्पा यातच रमणारे, माणसांतील चांगले गुण हेरणारे, मोकळेपणाने कौतुक करणारे, नातवंडांच्यात जीव गुंतलेले अशी अनेक रूपं वारंवार दृष्टीस पडायची. एरवी सिमेंट-काँक्रीट- चाळ-दुरुस्ती अशा रुक्ष विषयात खुश असायचे पण अचानक त्यांची रसिकता दिसायची - एका ट्रीपला ते मम्मीचं नेलपॉलिश कौतुकाने न्याहाळत होते, आणि पटकन म्हणाले, हां हे छान आहे, आता अमेरिकेला जाशील तर मांडला हेच घेऊन ये… आता वय झालं होतं, थकले होते, त्यांच्या जाण्याची बातमी धक्कादायक नक्कीच नाही. पण परदेशी जाताना नमस्कार करणारे आणि ज्यांना नमस्कार करावासा वाटतो ते अशांची संख्या आता खूप कमी आहे, ही खंत आहे. पूर्ण एका तपानंतर ते आता मंदाताईला भेटायला गेले आहेत… आता त्यांची काळजी नाही.

ती. दादा केतकर, शुक्रवार दिनांक 3 मे 2024 ला त्यांना देवाज्ञा झाली. दादा अतिशय हळू आवाजात आणि शांतपणे बोलत त्यांचा शेवट पण तसाच शांत. देहाला आणि दुसऱ्यांना पण क्लेश नाहीत. दादांची आणि माझी ओळख तशी माझ्या लहानपणी पासूनची पण संजयशी लग्न झाल्या नंतर नाते बदलले. आधी ते अभय आणि अजितचे दादा होते तर नंतर संजयचा मामा, रुढ अर्थाने माझे मामे सासरे पण मी त्यांना नेहमीच दादाच म्हणत असे आणि संजय नेहमी मामा म्हणत असे. दादांबद्दल माझ्या मनात, लग्ना आधी एक आदरयुक्त भीती होती पण आमचे लग्न झाले आणि नंतर त्यांच्याशी जेव्हा केव्हा संवाद होत असे तेव्हा ते अंतर नाहीसे झाले. आता आपण management च्या पुस्तकात वाचतो तो शब्द म्हणजे empathy पण दादा ते जगत होते, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम सांगा त्याचे solution तुम्हाला सर्वाथाने परिपूर्ण आणि समाधान कारक असे मिळत असे. 2012 नंतर ते जेव्हा जेव्हा मुंबईत राहायला येत असत तेव्हा रात्री जेवायला आमच्या कडे येत असत आणि संजय आणि माझ्याशी, समिपाशी ते खूप गप्पा मारायचे. आमच्या घरातल्या एका बेडवर त्यांची एक dining seat होती तिथे बसून ते जेवायचे. माझ्या हातची खीर आणि भाजणी वडे त्यांना खूप आवडत असत. मी ऑफिसमधून येताना त्यांना हाक मारून वर यायची तर म्हणायचे अग जरा दम खा मग मी येतो पण मग संजय, मी आणि दादा, समी घरी असेल तर आम्ही चौघे चहा घेऊन मगच आमचे जेवण होत असे. दादांनी जेवून झालेले ताट स्वच्छ असे. त्यांनी जेवणाला कधीही नाव ठेवले नाही किव्वा आवडले नाही असे म्हटले नाही. मामा, मामी आणि आजी म्हणजे संजयचे दैवत. ऑफिस आणि इतरही managenent साठी ते चालते बोलते Encyclopedia होते. अतिशय मृदू आवाज ही त्यांची खासियत होती, म्हणायचे की एखाद्या माणसाला तू मूर्ख आहेस हे जितके हळू सांगता येईल तितक्या हळू आवाजात सांगावे.तसेच लहान मुलांना ओरडायचे नाही तर त्यांना समजावुन सांगायचे. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणचे त्यांना कसलाही कधीच गर्व नव्हता ना हुशारीचा ना श्रीमंतीचा. पुण्याला जाताना डेक्कन quuen च्या सेकंड कलासच्या डब्ब्याने आणि ते पण D4ने जाणे त्यांना आवडायचे कारण शेजारी pantry असे आणि त्यात काचेच्या कपातून चहा मिळे. एकदा समीपा त्यांना V.T. ला सोडायला गेली तर 66 नंबरच्या बसने गेले टॅक्सीने जायला तयारच नव्हते. एवढे उच्च पदावर असून त्यांना कपड्याचा किव्वा perfumes चा अजिबात सोस नव्हता पण एक प्रसंग माझ्या आणि संजयच्या अजूनही लक्षात आहे की संजयच्या 50 व्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही त्यांना त्या वर्षी दिवाळीत दिलेला T शर्ट ते आवर्जून घालून आले होते. गेल्यावर्षी आम्ही पुण्याला गेलो तेव्हा परत निघताना संजयला म्हणाले अरे परत ये तेव्हा कुणाला माहीत होते की परत येणे हे असे होणार आहे. अशा अनेक आठवणी आहेत पण त्या सर्वांचा उल्लेख इथे करणे शक्य नाही पण नकळतपणे त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. सौ संगिता संजय नामजोशी

Dear Dada My favourite memories of you are you walking me to school, me writing letters to you by post and going on walks with you when you would visit London. When I used to visit Mumbai, you would always talk to me and gave me the best advice on everything. You taught me, by example, how to become a balanced person and to be kind to others. Thank you for always believing in me, never judging me, and for always seeing the best in others. From your granddaughter, Ana
Show your support by sending a sympathy gift or making a donation.